जालना जिल्हापरतूर तालुका

पोलीस उपनिरीक्षकाकडून पत्रकारांना उद्दटपणाची वागणूक

पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर.

परतूर/दीपक हिवाळे न्यूज नेटवर्क
परतूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुनील बोडखे यांच्याकडून उद्यटपणाची वागणूक मिळत असल्याचे समोर आले असून याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पत्रकार संघ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले
सविस्तर वृत्त असे की दिनांक ०२ सप्टेंबर रोजी दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी अजय देसाई हे विद्यार्थी मित्राची टी.सी.हरवली असल्या बाबतची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता कोणतेही कारण नसताना उपनिरीक्षक सुनील बोडखे तिथे आले आणि त्यांनी पत्रकार अजय देसाई व त्या विद्यार्थी याला उद्दटपणाने बाहेर जाण्यास सांगितले.


यापूर्वी ही अनेकवेळा पत्रकारा सोबत अपमानजनक वागणूक देत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
पत्रकारांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळत असेलतर सर्वसामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल असा प्रश्न ही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
जनता आज पत्रकार यांच्याकडे लोकशाही चा चौथा आधार स्तंभ म्हणून पाहत असून या निमित्ताने वृत्त संकलन करण्यासाठी वेळोवेळी पोलीस ठाण्यात जावे लागत असून जर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून अशी वागणूक मिळत असेलतर ही लोकशाहीची चेष्टा ठरेल.म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री सुनील बोडखे यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी तसेच सदरील घटनेचा परतूर पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध ही करण्यात आला
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आशिष गारकर,परतूर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्यामसुंदर चित्तोडा, योगेश बरीदे,अजय देसाई, माणिक जैस्वाल, कैलास सोळंके, प्रभाकर प्रधान,संजय देशमाने,राजकुमार भारुका, अशोक साखळकर, शामसुंदर सोनी,दीपक हिवाळे,भारत सवणे,मनीष अग्रवाल, आशिष धुमाळ,सुरेश कवडे,परमेश्वर बिल्हारे,कैलाश चव्हाण, एम.एल.कुरेशी, संतोष आखाडे, राहुल मुजमुले, अजय कांबळे, सय्यद तय्यब, माजेद पठान, शेख आसेफ, अनिल मगर,इम्रान कुरेशी,मुमताज अन्सारी,शेख तारेख यांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक