जालना जिल्हा

घनसावंगी येथे 16 हजाराची विदेशी दारु व बियर पकडली

घनसावंगी प्रतिनिधी / नितीन तौर दि ३ सप्टेंबर

घनसावंगी येथील एका हाॅटेलवर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 16 हजार 50 रुपयांची अवैध विदेशी दारु व बियर जप्त केली.


या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घनसावंगी येथे अवैध विदेशी दारु व बियर विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सकाळी घनसावंगी येथील एका हाॅटेलवर छापा टाकून 16 हजार 50 रुपयांची अवैध विदेशी दारु व बियर जप्त केली. ही कार्यवाही करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी दोघाजणा विरोधात घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारु विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संपत पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भिसे, पो.हे.का. शांतिलाल दाभाडे, राजेंद्र वेलदोडे, राम पव्हरे, किशोर जाधव, दिपक पाटील, महिला पोलिस अलका केंद्रे, रत्नमाला येडके व चालक धोंडीराम मोरे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक