अंबड तालुका

पत्रकार अनिल भालेकर यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल

न्यूज जालना( ब्युरो दि ४ सप्टेंबर)

अहमदनगर येथील ध्येय उद्योग समूहाचा वतीने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी साठी दरवर्षी शिक्षक दिनाच्या अवचीत्याने राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यंदाचे पुरस्काराचे हे बारावे वर्ष आहे.शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.


सन 2020 साठीचा हा पुरस्कार अंबड येथील सहशिक्षक व पत्रकार अनिल भालेकर यांना जाहीर झाला आहे.
अनिल भालेकर यांनी शैक्षणिक कार्य करत असताना विद्यार्थ्यांनासाठी नवनवीन संकल्पना यशस्वीपणे अंमलात आणण्या बरोबरच विद्यार्थ्यांना सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपली असणारी जबाबदारी अंगी रुजवण्यासाठी विद्यार्थांना सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता,वृक्षारोपण, सामाजिक बांधिलकी बाबत ते सातत्याने मार्गदर्शन करत असतात. क्षेत्रीय भेट अंतर्गत बँक,पोस्ट ऑफिस,बस स्थानक,कारखाने या ठिकाणी कामकाज कसे पार पाडले जाते,ऐतिहासिक स्थळे,त्यांचा इतिहास,उपयोगिता बाबत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना क्षत्रिय भेट घडवून विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहल ते दूर करण्यासाठी सातत्याने अशा क्षेत्रभेटीचे आयोजन करत असतात. वॉटर बेल संकल्पना, लंच टाईम वर्तमानपत्र वाचन, महापुरुष चरित्र वाचन अदी उपक्रम यशस्वीपणे त्याने शाळेत राबवलेले आहे.विज्ञान प्रदर्शन, क्रीडा,सांस्कृतिक,वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.

नृत्य,लेझीम,भाषण,कवायती बाबत त्यांना विशेष आवड असून ते या बाबत मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेत असतात.विद्यार्थी प्रिय असणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. या वर्षीच्या शिक्षक दिनी त्यांना दिल्या जाणारा राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाल्यामुळे त्यांचे न्यूज जालना परिवार व सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक