Breaking News
घनसावंगी तालुका

तिर्थपुरीतील मध्यवर्ती बँकेत निराधारांच्या अनुदान वाटपात तफावत

तीर्थपुरी /अशोकराव खेत्रे दि ४ सप्टेंबर निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानात तहसील कार्यालयाने तफावत केली असून लाभार्थ्यांना कमी-जास्त प्रमाणात रक्कम मिळत असल्याने लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला असून या प्रकारामुळे तीर्थपुरी च्या जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गोंधळ निर्माण झाला असून लाभार्थ्यांना समजावून सांगताना बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की सरकार संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना महिण्याला प्रत्येकी एक हजार रुपयाचे अनुदान देते. त्या अनुषंगाने वाटपही होत होते मात्र यावेळी तहसील प्रशासनाने एप्रिल, मे व जून या तीन महिन्यासाठी चे अनुदान बँकेकडे वर्ग केले आहे यात काही लाभार्थ्यांना १६००,काही लाभार्थ्यांना २००० तर काही लाभार्थ्यांना ३००० रुपये अनुदान देण्यात आले आहे वास्तविक सर्वांना प्रत्येकी तीन हजार रुपये देणे अपेक्षित होते. तीर्थपुरी येथील बँकेच्या शाखेत संजय गांधी निराधार योजनेच्या २२४ लाभार्थ्यांना २००० तर २६४ लाभार्थ्याना ३००० रुपये,श्रावणबाळ योजनेच्या ९२ लोकांना ३००० तर४९०+८८ लोकांना १६०० रुपये व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेतील १८६+५४ लोकांना १६०० रुपये देण्यात आले आहेत.तर केवळ चार महिलांना प्रत्येकी चार हजार अनुदान देण्यात आले. यात तफावत असल्याने लाभार्थी मात्र बँकेतील कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसत आहे.
अधिकाऱ्याचा प्रतिसाद मिळेना…! दरम्यान या संदर्भात तहसीलदार नरेंद्र देशमुख व भोजने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान ही तफावत दूर करून सर्वांना समान अनुदान देण्यात यावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक