जालना जिल्हा

कायम विनाअनुदानित शब्द काढा नसता तीव्र आंदोलन छेडु:-प्रा.डोईफोडे

जालना प्रतिनिधी दि ४ राज्यातील कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढून टप्प्याटप्प्याने अनुदान घ्यावे नसता महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालय प्रा,व कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . सन 2001 पासून महाराष्ट्र शासनाने शाळा,कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयांना अन्याय कारक असे कायम विनाअनुदानित तत्व सुरु केले. कालांतराने शासनाने शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द काढून अनुदान दिले परंतु वरिष्ठ महाविद्यालयांना सापत्न वागणूक देत अनुदानापासून वंचित ठेवले मागील वीस वर्षापासून ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात योगदान देणारा उच्चविद्याविभूषित प्राध्यापक व कर्मचारी वर्ग अजूनही कायम विनाअनुदान या तत्त्वा मुळे उपाशीपोटी राहून हलाखीचे जीवन जगत आहे. यामुळे आमच्या जीवनात निराशा आणि उद्विग्नता निर्माण झाली आहे. मागील 80 दिवसा पासून “घर बैठे बेमुदत धरणे आंदोलन” चालूच आहे शासनाला रोज याबाबतची माहिती पाठवून देखील शासन याकडे लक्ष देत नाही. म्हणून आम्ही आज दि.5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिनानिमित्त या असंवेदनशील आणि पक्षपाती शासनाचा जाहीर निषेध करीत आहोत. अनुदानित आणि कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे कार्य सारखेच असताना देखील शासन पक्षपातीपणाची वागणूक देत आहे. ही विषमता नष्ट करुन “समान काम समान वेतन” मिळाले पाहिजे. शासनाकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तर राज्यातील कायम विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी रस्त्यावर उतरून कोरोना या भीषण महामारी च्या काळात आंदोलन करू त्यामुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यास सर्वस्वी शासनच जबाबदार राहील. आम्हाला न्याय द्यावा नसता तीव्र अंदोलन करू अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजाराम डोईफोडे,उपध्याक्ष धनंजय देशमुख ,कोषाध्याक्ष प्रा.कमलाकर रगडे,सचिव प्रा.कडुबा म्हस्के,सहसचिव प्रा.अशोक खरात यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक