देशविदेश

जालन्यात भरदिवसा थरार, हाणामारीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू तर तिसरा गंभीर

न्यूज जालना ब्युरो : दि ४ जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून तिसरा भाऊ गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादावरून करण्यात आलेल्या जबर हाणामारीत जमावाने दोन सख्या भावांचा खून केला आहे . ही घटना जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथे शुक्रवारी ( ता.चार ) सकाळी घडली आहे . राहुल गौतम बोर्डे ( वय 25 ) व प्रदीप गौतम बोर्डे ( वय 21 ) असे या मयत तरुणांचे नावे आहेत . दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी पंधरा संशयितांना ताब्यात घेतले आहे . पानशेंद्रा येथील राहुल गौतम बोर्डे याचे काही दिवसांपूर्वी गावातील काही व्यक्तींसमवेत वाद झाला होता . या वादाचा राग धरून गावातील बारा ते पंधरा जणांनी शुक्रवारी ( ता.चार ) पहाटे राहुल गौतम बोर्डे व त्याचा भाऊ प्रदीप गौतम बोर्डे या दोघांवर प्राणघातक हल्ला करून काठ्या , दगडाने जबर मारहाण केली . या मारहाणीत राहुल गौतम बोर्डे याचा जागीच मृत्यू झाला . तर प्रदीप गौतम गंभीर जखमी झाला होता . त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र , उपचारादरम्यान त्याचा ही मृत्यू झाला आहे .  दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक चैतन्य एस , अप्पर पोलिस अधीक्षक समाधान पवार , उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर , तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे त्यांच्यासह तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी , स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले . दरम्य याप्रकरणी 15 संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक