जालना जिल्हा

जाफ्राबाद-चिखली रोडवर अपघात एकाचा मृत्यू


टेंभुर्णी/सुनील जोशी दि ४
दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात गणेशपुर ता.जाफ्राबाद येथील भाऊसाहेब कडूबा गाडेकर(वय 32)या युवकाचा मृत्यू झाला आहे

याविषयी अधिक माहिती अशी कि भाऊसाहेब गाडेकर हे गुरुवारी ता.3 आपली दुचाकी एम. एच. 21 व्ही.ई.9223 वरून आपल्या मावशी भिकाबाई विष्णू भगत यांना सोडण्यासाठी मिसाळवाडीकडे जात होते.जाफ्राबाद ते चिखली रोडवर पिंपळखुटा गावाच्या अलीकडे पिंपळखुट्याहुन येणाऱ्या दुचाकीशी गाडेकर यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते.उपचारासाठी जालना येथे नेत असतांना दवाखान्याजवळ पोहचत असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.

जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.जालना येथील कदिम जालना पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपासासाठी कदीम जालना पोलीस हे प्रकरण जाफ्राबाद पोलिसांकडे वर्ग करणार आहेत.सदर अपघातात जखमी झालेल्या भिकाबाई भगत यांच्यावर जालना येथे उपचार सुरु आहेत.भाऊसाहेब गाडेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ,एक बहीण, आई, वडील, भावजय असा मोठा परिवार आहे.भाऊसाहेब यांच्या पार्थिवावर गुरुवारी ता.3 उशीरा रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.ऐन उमेदीतील उमद्या युवकाच्या अपघाती जाण्याने गणेशपुर परिसरावर शोककळा पसरली आहे.भाऊसाहेब हे नवभारत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक कडूबा गाडेकर यांचे पुत्र तर टेंभुर्णीचे उपसरपंच गणेश गाडेकर यांचे कनिष्ठ भाऊ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक