जालना तालुका

मांस विक्री प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बबनराव वाघ,उपसंपादक

रामनगर : जालना तालुक्यातील मौजपुरी पोलीस ठाण्यात शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता गोमांस विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांना खबऱ्या मार्फत माहीती मिळाली की रामनगर येथील एका घराच्या शेजारच्या खोलीत एक इसम गोमांस विक्री करीत आहे. यावर साईनाथ रामोड यांनी पोलीस उपनिरीक्षक आर डी बिराजदार यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मास व एका जनाला ताब्यात घेण्यात आले आहे यात

आरोपी इब्राहीम कुरेशी याचे विरुध्द मौजपुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारीत अधिनीयम कलम 5 क / 9 अ, आय पी सी 429 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आर व्हि राव करीत असल्याचे ठाणे अमलदार रविंद्र ईथापे यांनी सांगीतले. तर दरम्यान जप्त केलेले मास हे गोमांस आहे की अन्य आहे याबाबत अहवाल आल्यानंतर कळेल असे पोलिसांनी सांगितले

मौजपुरी पोलीसांनी जप्त केलेल्या मांसाचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहे याबाबत लवकरच अहवाल दिला जाईल

डॉ सांगुळे, पशुचिकीत्सक रामनगर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक