Breaking News
जालना जिल्हा

जालन्यात महावितरण कार्यालयासमोर मनसेचे धरणे आंदोलन

जालना / प्रतिनिधी दि ४

जालन्यात महावितरण कार्यालयासमोर मनसेच्या वतीने वीजबिल वाढ होत असल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाप्रमुख गीते यांनी सांगितले की वीजबिल वाढी मुळे शेतकरी सध्या मेटाकुटीस आलेला आहे आणि शासन आणि महावितरण हे सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्याना वेटीस धरण्याच काम करत आहे.

त्यामुळे मनसेच्या वतीने जाब विचारा हे आंदोलन महावितरण कार्यालया समोर करण्यात आले. तसेच अधिकाऱ्यांना वाढीव विजबिलाचा हार मनसैनिकांनी सप्रेम भेट दिला आहे.

येत्या आठ दिवसांमध्ये विजबिलाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरून खळळ् खट्याक केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील मनसे जिल्हाप्रमुख गजानन गीते यांनी दिला आहे.

यावेळी शहरअध्यक्ष-बाळु जाधव ,तालुक़ा सचिव-महादेव भोकरे , शहरअध्यक्ष-संजय जर्हाड, तालुक़ाउपाध्यक्ष-श्रीकांत राठोड,उपाध्यक्ष-शिवाजी पवार,उपाध्यक्ष-कृष्णा पिसोरे,वैभव सळे,गणेश शिंदे,कैलाश नरोंडे,रोहण कणसे,सुशील देशमुख,सुनील जाधव, विशाल साबळे,भीमा बिडे,मनोहर गाते,गंगाधर गिरी,अनिल गायक़वाड़,शेख़ ज़मीर,कृष्णा राठोड उपास्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक