Breaking News
इफेक्ट न्यूज जालनापरतूर तालुका

परतूरमधील ‘ त्या ‘ तलावाची साफसफाई सुरू

न्यूज जालना बातमीचा इम्पॅक्ट


दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क
आंबेडकर नगर परिसरात असणाऱ्या तलावातील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूज जालना ने बातमी प्रकाशित केली होती त्याचाच परिणाम म्हणून नगरपालिकेच्या वतीने शुक्रवारपासून तलावाच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीपासून आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


परतूर येथील गाव विभागातील आंबेडकर नगरला लागूनच एक जुना तलाव आहे.परंतु या तलावातील पाणी सडल्यामुळे आंबेडकरनगरसह मुजमुले गल्ली,गोंधळी गल्ली,पंजीतन गल्ली,सुतार गल्लीसह देशपांडे गल्लीतील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त झाले होते.या पाण्याची दुर्गंधी एवढी तीव्र होती की नागरिकांना घरात बसणे देखील दुरापास्त झाले होते.तसेच रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते ,अर्जुन पाडेवार ,द,या,काटे,यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना तलावातील सडलेल्या पाण्यामुळे पसरलेली दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याची शक्यता याबाबत सविस्तर निवेदन देऊन लक्ष देण्याची विनंती केली होती.याशिवाय माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्याशी याबाबत चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली होती.

त्यानंतर माजीमंत्री आ.बबनराव लोणीकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सुधीर गवळी यांच्याशी फोनवर संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या.याबाबत सर्वतोपरी मदत करू असा विश्वास दिला.शुक्रवारी या तलावाच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले.दरम्यान,तलावातील सडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीचा प्रश्न पाठपुरावा करून मार्गी लावल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार,द.या.काटे यांचे शहरात अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक