Breaking News
अंबड तालुका

अंबड तालुक्यात एकाच दिवशी आढळले ह्या गावात २३ रुग्ण पॉझिटिव्ह

न्यूज जालना लाइव्ह (ब्युरो दि ५ सप्टेंबर ) जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यातील 39 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर 55 जणांचा अहवाल निघेटिव्ह प्राप्त झाला आहे .यात विशेषतः अंबड तालुक्यातील २३ रुग्णांचा समावेश आहे यात अंबड तालुक्यातील एकाच दिवशी 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे पाथरवाला गावातील ६ जणांचा समावेश आहे त्या सोबतच हस्तपोखरी येथील ६ , दुधगाव२,पानेवाडी २,रुई १,गहिनाथ नगर अंबड ५ ,पिंपरखेड २,मंठा १,बानेगाव ( ता अंबड),बीड जिल्हा १,श्रीकृष्ण रुक्मिणी नगर १,जयश्री नगर जालना १,पोलीस कॉटर १,निमखेडा जाफराबाद, श्रीपुर मंठा १,कोर्ट रॉड अंबड,समर्थ नगर जालना २,गोपिकीशन नगर जालना १,देऊळगाव राजा १ चा समावेश आहे ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी महिती दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक