Breaking News
घनसावंगी तालुका

विना विद्यार्थी शाळा पडल्या ओस ….!कोरोणा परीणाम

जांबसमर्थ, प्रतिनिधी कुलदीप पवार
कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शालेय विद्यार्थ्यांना मार्च महिन्यापासून सुट्टी मिळाली आहे.आता या सुट्टीलाही विद्यार्थी हे कंटाळले असुन शाळा कधी सुरू होईल,याची आतुरतेने वाट बघत आहे.मे,जून महिन्यात कडक उन्हाळा राहत असल्याने हे दोन महिने विद्यार्थ्यांना शाळा स्तरावरून सुट्टी दिली जाते.

परंतू या वर्षी कोराणामूळे मार्च महिन्यात परीक्षा न घेताच शाळा बंद झाल्या आणि सलग पाच महिन्यांपासून विद्यार्थी घरीच आहे.कोराणामूळे बाहेर फिरायला जाता येत नसल्याने आणि शाळाही बंद अवस्थेत असल्याने आता हे विद्यार्थी कंटाळले आहेत.विद्यार्थी मैदानी खेळापासून दूर असल्याने शाळेमध्ये मिळणारा आनंद घरी राहून मिळत नाही.परीपाठ,अभ्यास,खेळ मित्रांबरोबरची मौजमजा,मैदानावरील विविध खेळ,शाळांतील इतर आनंददायक वातावरण, विविध उपक्रम यामध्ये विद्यार्थी मनसोक्त रमत होते.शिक्षणासोबतच अन्य माहिती सुट्ट्यांमुळे या सर्वांपासून विद्यार्थी दिवसेंदिवस दूर जात आहे.या मुळे विद्यार्थी फार कंटाळून गेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक