परतूर तालुका

परतूर तालुक्यात परत एकाच दिवशी 24 जण कोरोणा पॉझिटिव्ह

दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क दि ५ सप्टेंबर

रात्री उशिरा आलेल्या अहवालात परतूर तालुक्यातील पुन्हा 24 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याकारणाने परतूर करांच्या चिंतेत भर पडली आहे.

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. दरम्यान आज रोजी कोरोणा रुग्णाची एकूण संख्या 235 झालेली आहे ,175 जणांना उपचार करून घरी सुट्टी दिलेली आहे, 07 कोरोना रुग्ण दगावले असून , 53 सक्रिय (Activ) रूग्न रुग्णालयात उपचार घेत आहेत.

राञी उशिरा आलेल्या अहवालानुसार तालुक्यातील खांडवी येथील 70 वर्षीय महिला ,55 वर्षीय पुरुष ,50 वर्षीय महिला , 40 वर्षीय पुरुष ,35 वर्षीय महिला ,23 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय पुरुष, दैठणा येथील 28 वर्षीय पुरुष तसेच परतूर शहरातील लड्डा कॉलनी मोंढा येथील 37 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 19 वर्षीय महिला सरस्वती कॉलनी येथील 28 वर्षीय महिला, 6 वर्षीय पुरुष, 4 वर्षीय महिला , आदर्श कॉलनी परतूर येथील 45 वर्षीय महिला , राजपुत गल्ली परतूर येथील 34 वर्षीय पुरुष ,66 वर्षीय पुरुष , 27 वर्षीय महिला , मोंढा परतूर येथील 38 वर्षीय पुरुष , विठ्ठल नगर परतुर येथील 36 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, व 26 वर्षीय पुरुष असे एकूण 24 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद जाहेद यांनी न्यूज जालना प्रतिनिधीस दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक