जालना जिल्हा

त्या बलात्कार प्रकरणातील आरोपींची जेलमध्ये रवानगी

जालना न्यूज ब्युरो दि ५

मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी आलेल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना राजूर रोडवरील एका जणाच्या शेतात घडली होती. या प्रकरणात चंदनझीरा पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. सात दिवसांच्या कस्टडीनंतर या आरोपींची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

राजूर रोडवरील एकाच्या शेतात मुगाच्या शेंगा तोडण्यासाठी मुलगी कामाला येत होती. दरम्यान, त्या ठिकाणी कामावर असलेल्या दोन जणांनी सदरील मुलीशी जवळीकता साधून तिला बांधून बलात्कार केला होता.या घटनेनंतर सदरील मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला होता. अश्लील व्हिडीओ दाखवून हा प्रकार आरोपींनी केला होता. पोलिसांनी मोबाईल, बांधलेली दोरी आदी साहीत्य जप्त केले.

चंदनझिरा पोलीसांनी आता या आरोपींना कडक सजा होण्यासाठी सबळ पुरावे गोळा केले आहे. काही दिवसातच आरोपींवर दोषारोपपत्र दाखल करीत आहेत. या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे, एपीआय प्रमोद बोंडले यांच्यासह ईतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक