जाफराबाद तालुका

हरिभाऊ रोंघे यांचे औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात निधन

बबनराव वाघ,उपसंपादक

जालना- महामार्ग पोलीस पथकात कार्यरत असलेले पोहेकाँ. हरिभाऊ रोंघे यांचे औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात आज सकाळी निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 49 वर्षे होते.

न्युज जालना : मागील शुक्रवारी (ता. 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी जालना तालुक्यातील विरेगाव येथून पोहेकाँ. हरिभाऊ रोंघे हे मोटारसायकलने जालन्याकडे येत होते. पाऊस सुरु असल्यामुळे मोटारसायकल घसरून त्यांचा अपघात झाला होता. अपघातात डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली होती. प्रारंभी त्यांना जालना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसानंतर त्यांना औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. काल त्यांना बरे वाटत असल्याने त्यांनी दिवसभरात पोलीस दलातील अनेक मित्रांना फोन करून तब्येतीत पूर्णपणे सुधारणा झाल्याचे सांगितले होते. काल रात्री उशिरा त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे पुन्हा त्यांना औरंगाबादच्याच एका खाजगी रुग्णालयात हलविले होते. आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली.
अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असलेले हरिभाऊ रोंघे यांनी जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात सेवा बजावली आहे. त्यांचा पोलीस दलातील सहकाऱ्यांसह समाजातही मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्यावर आज सायंकाळी त्यांचे मूळगाव विरेगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, फोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक