घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यातील एकाच गावात १६ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह.

पिंपरखेड बु येथील दहा दिवसांत एकुन रुग्ण संख्या ४४ वर

न्यूज जालना( ब्युरो) /पिंपरखेड प्रतिनिधी दि ५ सप्टेंबर

घनसांवगी तालुक्यातील पिपंरखेड बु येथे एकाच दिवशी १६ जणांचे स्वँब पॉझिटिव्ह आले असल्याचे आरोग्य सूत्रांनी सांगितले .यात ९ महिला व ७ पुरुषांचा समावेश आहे.

पिंपरखेड बु येथील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता घनसावंगी तालुक्यातील सर्वाधिक वेगाने पॉझिटिव्ह रुग्ण वाढणारे गाव असल्याचे समोर येत आहे.पिंपरखेड बु येथील मागील दहा दिवसांत एकुन रुग्ण संख्या ४४ वर पोहचली आहे यातील २ रुग्णांना सुट्टी मिळालेली असून गावातील ४२ ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे.

दरम्यान घनसावंगी तालुक्यातील रवाना गावात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने घनसावंगी तालुक्यात शनिवारी पाच वाजेच्या नंतर एकूण वीस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक