जालना जिल्हा

जिल्हा बँकेच्या पानेवाडी शाखेतून सव्वासात लाखाच्या रोकडसह तिजोरी लंपास

  न्यूज जालना ब्युरो दि ५ घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी गावातील जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे चॅनल गेट आणि दरवाजाचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार काल सकाळी उघडकीस आला होता. चोरट्यांनी थेट बँकेची लोखंडी तिजोरी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर गायब केला. या तिजोरीत रोख 7 लाख 28 हजार 168 रुपये होते. रोख रक्कम, 12 हजाराची लोखंडी तिजोरी आणि 10 हजाराचा डिव्हीआर, असा एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आले होते, मात्र तत्पूर्वीच चोरट्यांनी डल्ला मारला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे.बँकेचे शाखा व्यवस्थापक रघुनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक