परतूर तालुका

परतूरमध्ये काळ्या बाजारात जाणारा राशनचा तांदूळ पकडला; ८ लाख १४ हजाराचा मुद्देमाल जप्त

परतूर /दीपक हिवाळे दि ५

परतुर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाला राशनचे तांदूळ काळ्या बाजारात ट्रकमध्ये विक्रीसाठी जात असल्याची गोपीनिय मिळाली होती. या माहितीनुसार यदलापूर पाटीवर पोलिसांनी जालन्याकडून मंठाकडे राशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पकडून आठ लाख चौदा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, एक ईसम आपल्या ट्रक मध्ये राशनचे तांदूळ हे काळ्या बाजारात चोरटी विक्री करण्यास जालन्या कडून मंठ्याकडे जाणार आहे. अशी माहीती मिळाल्याने सदर मीहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर यांना कळविले व त्याच्या मार्गदशनाखाली यादलापुर पाटी जवळ पोलिसांना सापळा रचला.

काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास जालना कडून एक ट्रक येताना पोलिसांना दिसला त्यास बँटरीच्या लाईटने व शीटी वाजवून ट्रक थाबवण्याच इशारा पोलिसांनी केला. चालकाने ट्रक थांबवला चालक व किंनरचे नाव गाव विचारले आसता त्याने आपले नाव विकास दूलीचंद चव्हाण (वय 25) वर्षे व्यवसाय ड्राव्हर रा.छोटा गोंदिया , जि. गोंदिया व किन्नर महेंद्र गूलाब ताडेकर वय 35 वर्षे व्यवसाय किन्नर रा.छोटा गोंदिया , असे सांगितले.

त्यास ट्रक मधील माला बाबत विचारणा केली आसता त्याने सूरूवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यांना पोलिसांनी खाकी दाखवताच त्याने कबुली देत ट्रक मध्ये राशनचे तांदूळ आह असे सांगितले. ट्रक क्र एम.एच.35 के 3521 मध्ये जाऊन पोलिसांनी खात्री केली आसता ट्रक मध्ये राशनचा तांदुळ मिळून आला.

त्याचा पंचासमक्ष जप्ती पंचनामा केला आहे.त्यात एक लाख चौदा हजारच्या वेग वेगळ्या खताच्या व ईतर 285 कट्टे (थैल्या) मध्ये राशनचे तांदूळ, तसेच सात लाख रुपये किमतीचा एक बारा टायर असलेले ट्रक असा एकूण आठ लाख चौदा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक