घनसावंगी तालुका

काेराेणाची साखळी ताेडण्यायाठी पिपंरखेड बु १० दिवस लॉकडाउन …!

धर्मराज आंधळे/ पिंपरखेड दि ६
सध्या देशात कोरोना व्हायरस मुळे भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाने लॉक डाऊन खुले केल्यामुळे सदर आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे.

हा आजार अगदी पिपंरखेड गावात येऊन पोहचलेला आहे. व कमी वेळेत जास्त रुग्ण आढळुन आले आहेत आज रोजी गावात सुमारे ४६ कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. या आजाराची आपल्या गावात जास्त लागण होऊ नये यासाठी व सदर आजाराची साखळी तोडण्यासाठी शासनाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून ग्रामपंचायतीच्या वतिने येणाऱ्या दिनांक ०७/०९/२०२० ते दिनांक १६/०९/२०२० या दहा दिवसासाठी कडकडीत किराणा दुकाना सहित गाव बंदीचा निर्णय घेतलेला असून, गावातील सर्व व्यापारी बंधूनी आम्हास सहकार्य करावे असे सरपंच सुनिता अशाेकराव आघाव यांनी परिपञकात म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक