घनसावंगी तालुका

जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड उद्धव भवलकर यांना राजा टाकळी येथे आदरांजली

न्यूज जालना ब्युरो दि ६

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते,सिटू कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष,कॉम्रेड उद्धव भवलकर याना आज राजा टाकळी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,सिटू व किसान सभेच्या गाव शाखेच्या वतीने आदरांजली अर्पण करून अखेरचा लाल सलाम करण्यात आला.
मागील 15 दिवसापासून भवलकर हे कोरोना आजाराशी झुंज देत होते,अखेर काल 5 सप्टेंबर रोजी त्यानी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे वय 68 वर्ष होते.

मराठवाड्यात सीटू संघटना मजबूत करण्यासाठी व कामगार चळवळ धारदार बनवण्यासाठी काम्रेड भवलकर यांचे योगदान लक्षणीय होते .ते लढाऊ कामगार नेते होते. शेतकरी- कामगार- शेतमजूर यांची एकजूट झाली पाहिजे यावर त्यांचा भर होता.

यावेळी श्रद्धांजली कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना कॉम्रेड गोविंद आर्द्ड त्यांच्या कार्याची माहिती दिला.सीटू, कामगार चळवळ व डाव्या चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. कॉम्रेड आमचे पितृतुल्य नेतृत्व होते त्यांचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन असायचे त्यांच्याकडून आम्हाला खूप शिकायला मिळाले त्यामुळे आमच्यासारखे मराठवाड्यात कार्यकर्तेर तयार झाले .पक्ष सिटू किसान सभा वाढवण्यासाठी त्यांची सतत तळमळ होती.त्यांनी संपूर्ण आयुष्य कामगार कष्टकऱ्यांसाठी खर्च केले.असे त्यांनी सांगितले.


यावेळी गोविंद आर्दड,आसारामजी आर्दड,बाळराजे आर्द्ड,जनार्धन भोरे,बळीराम आर्द्ड,कुलदीप आर्दड, रमेश शिंदे मारोती शिरगिरे आदींची उपस्तीती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक