Breaking News
भोकरदन तालुका

पोलवरील झुकलेल्या विजेच्या ताराकडे महावितरणचे दुर्लक्ष

  पिंपळगाव रेणुकाई/ता भोकरदन दि ६

पिंपळगाव रेणुकाई परिसरातील कल्याणी येथील शेत शिवारामध्ये महावितरणचा भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे. कल्याणी गावालगत असलेल्या शेत-शिवारामध्ये लोंबकळणाऱ्या विद्युत तारा शेतकऱ्यांसाठी जीवघेण्या ठरत आहे. परंतु, महावितरण कंपनीचे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. एखादा अपघात झाल्यानंतर महावितरणला जाग येणार का…? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे कल्याणी येथील नागरिकांमधून तारांची दुरुस्ती करावी आणि संभाव्य जीवीतहानी टाळावी. अशी मागणी जोर धरत आहे. कल्याणी गावाजवळ पिंपळगाव रेणुकाईकडे येणाऱ्या रस्त्यावर विद्युत पोलवरील तारा झुकून जमिनीलगत लोंबकळत आहे. त्या विद्युत तारा इतक्या खाली लोंबकळत आहेत की, त्या तारांना हात देखील लागणे शक्य आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी मक्याचे पिक घेतात. अनेक शेतामधील मक्याचे पीक हे तारांच्या वरती गेलेले आहे. गावालगत असलेल्या शेतामध्ये अनेक ठिकाणी तारा जमिनिकडे झुकल्या आहेत. दीपक खंडाळकर या शेतकऱ्याच्या शेतामधील मक्याचे पीक ही अक्षरशः तारांच्या वरती पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती मशागत करताना देखील अडचणी निर्माण होत आहे. शॉर्टसर्किट झाल्यास पीकाला आग लागू शकते. तसेच, कल्याणी गावा हे जवळ असल्याकारणाने गावाला देखील याचा धोका पोहचु शकतो. परंतु, महावितरणला जणू या बाबीची जराही चिंता नाही, असे दिसुन येत आहे. महावितरण एखादी जीवितहानी किंवा दुर्घटना झाल्यावरच जागे होईल काय….? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे. महावितरणचे दुर्लक्ष…

कल्याणी गावालगत असलेल्या शेतामध्ये लोंबकळणाऱ्या या तारा मुख्य रस्त्यावरुन स्पष्टपणे दिसतात. तरीदेखील महावितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या कडेलाच त्याबद्दल तारांची डीपी देखील आहे. आणि हि देखील उघडी असल्यामुळे कळत नकळत या डीपीला देखील कोणाचा हात लागु शकतो. आणि अपघात होऊ शकतो. त्यामुळे महावितरण याकडे लक्ष द्यावे आणि लोंबकळणाऱ्या ताऱ्यांची देखील लवकरात लवकर दुरुस्ती करावी. अशी मागणी कल्याणी परिसरातील शेतकरी ग्रामस्तांमधून होत आहे.

गावालगतच माझे शेत असून मका पीक लावलेले आहे. शेतामधील विद्युत धारा खूपच खाली आल्या आहेत. मका पीक तारांच्या वरती गेलेले दिसते. त्यामुळे अंतर्गत मशागतीच्या वेळी अडचणी निर्माण होतात. एखाद्या वेळी तारांचे घर्षण होऊन आग लागू शकते त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होऊन कल्याणीगाव जवळ असल्यामुळे गावाला देखील याचा धोका होऊ शकतो. त्यामुळे महावितरण’ने याकडे लक्ष द्यावे. दीपक खंडाळकर शेतकरी कल्याणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक