Breaking News
जालना जिल्हा

गरजू वारकर्‍यांना एक महिन्याचं मोफत किराणा वाटपाचा शुभारंभ

जालना न्यूज ब्युरो दि ६ घनसावंगी तालुक्यातील बोररांजणी येथील रहिवाशी अखिल वारकरी संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष ह.भ.प. सतीश महाराज जाधव (शास्त्री) यांच्या संकलपणेतून वारकरी फाऊंडेशनचा शुभारंभ करत गरजू वारकर्‍यांना एक महिन्याचा मोफत किराणा वाटपाचा शुभारंभ श्री क्षेत्र तळ्यातील मारोती संस्थान मासेगाव येथून ह.भ.प भारतीदास साहेबराव महाराज कोठाळकर ,गूरूवर्य बळीराम म. माघाडे, तुकारामजी म. जाधव वारकरी फाऊंडेशनचे संस्थापक सतीश म. जाधव, सचिव पांडुरंग पडूळ, सरपंच ज्ञानोबा आनंदे, चेअरमन सुरेश आनंदे, संतराम आनंदे, शिवाजी आनंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वारकरी फाऊंडेशनचे संस्थापक तसेच वारकरी संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष सतीश म. जाधव (शास्त्री) बोलताना म्हणाले की वारकरी फाउंडेशन हे महाराष्ट्रातील वारकर्‍यांसाठी अडीअडचणीसाठी नेहमी तत्पर राहील तसेच समाजात गोरगरीब गरजू वारकर्‍यांना महिन्याला सात वारकर्‍यांची निवड करून त्यांना एक महिन्याचं किराणा मोफत वाटप करण्याचा संकल्प शुभारंभ या प्रसंगी केला आहे. गरजू वारकर्‍यांनी संपर्क करण्याचे जाधव महाराज यांनी आवाहन केले. यावेळी माधव म. नरवडे, रामायणाचा-र्य ह.भ.प. निवृती म. लकडे, गणेश म. जाधव, ह.भ.प. भगवताचा-र्य विष्णु म. आनंदे, ह.भ.प. रामेश्वर म. सवने, गणेश म. कोल्हे,डॉ. सचिन शेरे ,तुळशीराम म दाभाडे, उद्धव म. घोगरे, भाऊसाहेब साकळगावकर, चत्रभुज म. काकडे, अण्णासाहेब साबळे, अशोक मुजमुले, अनिल गवळी, अनिरुद्ध नालेगावकर, रामेश्वर भामट, उद्धव टाकसाळ, कृष्णा बिचकुले, विनोद जाधव, विष्णु लाडगे, चांगदेव म. काकडे,  संतोष राठोड, दत्ता म. आनंदे,  श्रीराम बघाटे, , मरकड, भगवान काकडे, कृष्णा काकडे, सुरेश उगले, किशोर उगले, पत्रकार छगनराव आनंदे, घनवट, हरी म बाहेकर, माऊली तांगडे, आदीची उपस्थिती होती. अखिल वारकरी संघाच्या नियुत्या मासेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल वारकरी संघाच्या जालना जिल्हातील पदाधिकारी यांना मराठवाडा कार्याध्यक्ष सतीश महाराज जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पदाधिकारी महाराज मंडळीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक