Breaking News
जालना जिल्हा

पानेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडुन तिजोरी नेणारी टोळी अवघ्या २४ तासात गजाआड

न्यूज जालना ब्युरो दि ६ मौजे पानेवाडी ता.घनसावंगी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडुन बँकेची तिजोरी नगदी रक्कमेसह उचलुन घेवुन गेले होते , त्यावरुन पोलीस ठाणे घनसावंगी येथे अज्ञात आरोपीतांन विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता शनिवारी रोजी पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की , पानेवाडी येथील बँक हि जालना येथील रेकॉर्डवरील आरोपी नामे हरदिपसिंग बबलुसिंग टाक वय २ ९ वर्ष रा.शिकलकरी मोहल्ला , जालना याने त्याचे साथीदारासह फोडली असल्याची माहीती मिळाली , त्यावरुन आरोपींच्या शोध कामी पोलीस निरीक्षक श्री राजेंद्रसिंह गौर हे स्थागुशाचे अधिकारी कर्मचारी असे जिल्हयात वेगवेगळया ठिकाणी रवाना झाले होते . स्थागुशा चे अधिकारी व कर्मचारी यांनी रेकॉर्डवरील आरोपी नामे हरदिपसिंग बबलुसिंग टाक वय २ ९ वर्ष रा.शिकलकरी मोहल्ला , जालना यास ताब्यात घेवुन विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने त्यांचे साथीदार नामे १ ) गोपिसिंग मलखानपिंग कलाणी २ ) किशोरसिंग ऊर्फ टकल्या रामसिंग टाक दोन्ही रा.शिकलकरी मोहल्ला , जालना ३ ) गजानन सोपान शिंगाडे रा.पाचनवडगांव ता.जि.जालना अशांनी मिळुन पानेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँक फोडल्याची कबुली दिली . इतर त्याचे साथीदारांचा शोध घेतला असता त्याचे साथीदार नामे २ ) गोपिसिंग मलखानसिंग कलाणी २ ) किशोरसिंग ऊर्फ टकल्या रामसिंग टाक दोन्ही रा.शिकलकरी मोहल्ला , जालना , ३ ) गजानन सोपान शिंगाडे रा.पाचनवडगांव ता.जि.जालना यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन गुन्हयातील गेले मालापैकी नगदी १,४४,८०० / – रुपये , बँकेतील गोदरेज कंपनीची लोखंडी तिजोरी ११ , ९ ३७ / – रुपये किंमतीची व गुन्हयात वापरलेले टाटासुमो गोल्ड चारचाकी वाहन व शाईन मोटार सायकल ज्याची किमत ५,०५००० / – रुपये तसेच आरोपी गजानन शिंगाडे यांने त्याचे वाटयात आलेल्या चोरीच्या पैशामधुन विकत घेतलेला एक युनिवर्सल कंपणीचा एलईड टि.व्ही किंमती ११,५०० / – रुपेयचा असा एकुण ६,७३,२३७ / – रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . गुन्हयात चोरलेली लोखंडी तिजोरी हि नमुद आरोपीतांनी जालना शहरातील द्वारका नगरचे पाठीमागील खदानीतील तळयात टाकल्यावरुन नमुद ठिकाणावरुन जे.सी.बी. च्या सहाय्याने तिजोरी काढण्यात आली आहे . सदर आरोपीतांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले टाटासुमो गोल्ड चारचाकी वाहन जालना शहरातील श्रीकृष्णनगर , संभाजीनगर येथुन चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले असुन याबाबत पो . स्टे . सदर बाजार जालना येथे गुरनं ५५१/२०२० कलम ३७ ९ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे . नमुद आरोपीतांना पुढील कार्यवाही कामी पोलीस ठाणे घनसावंगी येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पो.उप नि माने पो.स्टे . घनसावंगी हे करीत आहेत . सदरची कामगिरी एस.चैतन्य पोलीस अधीक्षक , जालना , मा . .समाधान पवार अपर पोलीस अधीक्षक , जालना , यांचे मार्गदर्शनाखाली , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर , पोउपनि दुर्गेश राजपुत , पोहेकॉ / ११४० कांबळे , पोहेकॉ / ७७० कुरेवाड , पोहेकॉ / ११७२ देशमुख , पोना / १११४ मगरे , पोना / ११५४ कायटे , पोना / २४८ बघाटे , पोना / ६६२ गडदे , पोना / ९ ४ ९ सागर बाविस्कर , पोना / १०६४ तंगे , पोना / ७०४ चौधरी , पोना / ७३ ९ फलटणकर , पोकॉ / १२६८ उबाळे , पोकॉ / १३४७ मांटे , पोकॉ / ७८८ जाधव , पोकॉ / ११४७ चेके , मपोना / ११ ९ ८ जायभाये चापोकॉ / पैठणे यांनी केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक