भोकरदन तालुका

पिंपळगाव रेणुकाई प्राथमिक आरोग्य केंद्राचा पंचनामा

न्यूज जालना ब्युरो दि ७ भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी भोकरदनचे बिडीओ उदय राजपुत व तालुका आरोग्य अधिकारी यांनी पंचनामा करुन सदर दवाखान्यातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विरोधात जनतेच्या व कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारी वरिष्ठाकडे सादर केलेल्या असुन शिवाय अनेक महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा गंभीर तक्रारी केल्या आहेत.दिंनाक २८ आॅग्स्ट रोजी येथील महिला आरोग्य कर्मचारी ए.एम.ठोंबरे.व लिपीक गायकवाड यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या सिईओ यांच्याकडे लेखी तक्रार सादर केल्या होत्या.त्यानुसार सिईओ यांनी भोकरदन पंचायत समिती बिडीओ यांना चौकशी अधिकारी नेमून चौकशी अहवाल सदर करण्याचे निर्देश दिले होते. बिडीओ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होत कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्याची झाडाझडती घेतली.यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक