Breaking News
औरंगाबाद जिल्हा

जायकवाडी धरणामधून गोदापात्रात 9973 क्युसेस पाण्याचा विसर्ग

पैठण न्यूज / दि ७ सप्टेंबर

जायकवाडी धरणामधून सोमवारी दुपारी गेट्स क्र.13,24,15,22 हे अर्धाफूट उंचीने उघडुन एकुन 2096 क्यूसे क विसर्ग गोदवारी पात्रात सोडण्यात आला.
सद्या स्थितीत द्वार क्रं 10,27,18,19,16,21,14,23,12,25,11,26,13,24,15,22 मधून 8384 क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून 1589 क्यूसेक इतका असा एकुण 9973 क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु असल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले

रविवारी जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात काल दुपारनंतर अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली . झालेल्या पावसाचे पाणी गतीने नाथसागरात दाखल होत असल्याने तातडीने रात्री १० वाजेच्या दरम्यान धरणाचे आणखी आठ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरीत विसर्ग वाढविण्यात आला . यामुळे आता धरणाच्या १२ दरवाजातून गोदावरी पात्रात ६२८८ असा विसर्ग होत आहे .

दरम्यान जायकवाडी धरण व बँकवाटर परिसरात अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे पाणी सरळ नाथसागरात दाखल होण्यास प्रारंभ झाला यामुळे अवघ्या तीन तासात धरणाचा जलसाठा ९ ८.२५ % झाला . गतीने धरणाच्या जलाशयात पाणी दाखल होत असल्याने जायकवाडीचे धरण अभियंता संदिप राठोड यांनी या बाबत वरिष्ठांना कल्पना दिली.जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी तातडीने धरणाचे आणखी आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून धरणातून विसर्ग करण्याचे आदेश दिले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक