Breaking News
भोकरदन तालुका

हरिती संघर्ष महासभेच्या विभागीय अध्यक्षपदी सिमा इंगळे यांची नियुक्ती

मधुकर सहाने : भोकरदन

दि.६ सप्टेंबर रोजी मानव मुक्ती मिशनच्या वतीने मराठवाडा विभागीय बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मराठवाड्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत.मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी सिमा नळणीकर -इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.

मानव मुक्ती मिशनचे अध्यक्ष नितीन सावंत,राष्टृजागृती वारकरी परीषदेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी महाराज सिरसगावकर,मानव मुक्ती मिशनचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अविनाश खाडे,छंदांम्सि कला साहित्य महासभेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष भगवानराव शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पञ देण्यात आले.

यावेळी मानव मुक्ती मिशन प्रेरित मजलिस ए इंसानियतच्या प्रदेश कार्याध्यक्ष सय्यद रफिक ,,मानव मुक्ती मिशनच्या मराठवाडा विभागीय संघटक रवी सदावर्ते,मानव मुक्ती मिशन जालना जिल्हाध्यक्ष ओंकार उबाळे,जालना जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष संतोष बोराडे,जालना जिल्हा संघटक संपत चंद पाटील,मानव मुक्ती मिशन घणसावंगी तालुका अध्यक्ष संदीप गोरे,तर सिल्लोड तालुका राष्ट्रजागृती वारकरी परिषदेचे तालुका अध्यक्ष म्हणून रवी संगळे , मानव मुक्ती मिशन मंठा तालुका अध्यक्ष दत्तात्रय बोराडे,मंठा तालुका सचिव अशोक घायाळ,यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वांनी निवडीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्टृजागृती वारकरी परीषदेचे जिल्हासंपर्कप्रमुख शाम शिरसाठ यांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.शंकर महाराज राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल भुतेकर यांनी केले.

मराठवाडा विभागीय बैठकीचे आयोजन राष्ट्रजागृती वारकरी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.शिवाजी महाराज इंगळे यांनी केले होते.यावेळी त्यांचेही सर्वांनी अभार व्यक्त केले.
या बैठकीस रविंद्र वराडे सिल्लोड तालुका अध्यक्ष मानव मुक्ती मिशन,ओम कायस्थ , पवन नागरे ,अनिल मदनुरे ,प्रदीप खाडे अदिंची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक