भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात मोटरसायकल चोरट्यास बारा तासाच्या आत केले जेरबंद

पारध पोलिसांची कारवाई

पिंपळगाव रेणुकाई ता भोकरदन दि ७

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जळकी बाजार येथील सतिष सुरडकर या शेतकऱ्यांनी उभी करून ठेवलेली हिरो कंपनची आय स्मार्ट एम एच डी.के.२०-७३५४ क्रमांकाची मोटर सायकल चोरट्यांनी दिं ६/९/२०२० संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी लंपास केली होती या बाबतची सतीश दामू सुरडकर तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद या शेतकऱ्याने पारध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

दरम्यान पारध पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून चोरीस गेलेली मोटार सायकल व आरोपी मंगेश जनार्दन कानडजे रा. कुलमखेड ता. जि. बुलडाणा या आरोपीस शिवना ता.सिल्लोड या परिसरात गुन्हा दाखल झाल्यापासुन केवळ 12 तासाचा आत शोध लावण्यास यशस्वी झाले असुन सदर मोटारसायकल व आरोपी मंगेश कानडजे यास ताब्यात घेतले आहे. गुन्हयाचा तपास बीट अंमलदार प्रकाश सिनकर पोलिस कर्मचारी सुरेश डुकरे , शिवाजी जाधव.यांनी सपोनी शंकर शिदे यांचे मार्गदर्शनाखाली केला आहे. गुन्हयाचा अधिक तपास सोनि श्री.शिंदे साहेब याचे मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार प्रकाश सिनकर करित आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक