परतूर तालुका

त्या बाबत एकता कपूरने माफी मागावी

आष्टी /प्रतिनिधी ७ :- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वर्जिन भास्कर वेब सिरीज च्या माध्यमातून अपमान करणाऱ्या एकता कपूर व बालाजी ए एल टी व जी फाईव्ह कायदेशीर कारवाई करणे बाबत सोमवारी आष्टी पोलीस स्टेशन येथे धनगर समाज संघर्ष समिती परतूर येथे निवेदन देण्यात आले

सविस्तर वृत्त एकता कपूर यांच्या मालकीची कंपनी व वर्जित भास्कर भाग 2वर्जन भास्कर या सिरीयल मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गर्ल्स हॉस्टेल या नावाच्या बोर्ड व त्या होस्टेल चे चित्रीकरण दाखविले आहे मात्र ही सीरियल वर्जनी सिटी संदर्भात आहे त्याचा विविध ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महान समाजसुधारक लोकहितवादी राज्यकर्ते होत्या त्यामुळे तर त्यांचे नाव एका अश्लील वेब सिरीज मध्ये दाखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला देशातील कोणत्याही महापुरुषाचे नाव अशा विकृत स्वरूपात या सिरीयल मध्ये दाखवण्याचा अधिकार तुम्हाला नाही

आज ते तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे ते केवळ महापुरुषांनी दिले दिलेल्या बलिदानातून मिळाले आहे या कृतीमुळे देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहे घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे त्याचे स्वरूप म्हणून आज आष्टी पोलीस स्टेशन येथे धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देऊन एकता कपूर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित योगेश भले बाबू गोसावी अर्जुन थोरात रमेश अंकुष्कर दीपक भालशंकर शंकर जाधव ज्ञानेश्वर सातपुते बाबासाहेब काळे रुस्तम गांजे आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक