जालना जिल्हा

रस्त्याने चालू स्कुटरने घेतला पेट, जिवीत हानी नाही

माणिकराव आढे / वाटूर न्यूज दि ७ परतुर तालुक्यातील वाढोणा ते श्रीधरजवळा रस्त्यावर चालू स्कूटरने पेट घेऊन पूर्णपणे जाळून खाक झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. अधिक माहिती अशी की, मंठा येथील बालासाहेब गणपतराव भाबट हे सोमवारी दुपारी श्रीधर जवळा येथे नातेवाईकांकडे दुपारी जात असताना वाढोणा ते श्रीधरजवळा या रस्त्यावर अचानक स्कूटीने पेट घेतला. गाडीतून धूर निघत असल्याने लक्षात आल्या नंतर गाडी उभा केली असता अचानक आगीचा भडका होत आगीत पूर्ण गाडी जाळून खाक झाली आहे. या आगीत गाडीचे पूर्ण नुकसान झाले असून या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक