जाफराबाद तालुका

टेंभुर्णी अर्धे गाव गाव अंधारात, ग्रामस्थ उपोषणाच्या तयारीत..!

अकोलादेव/ बि. डी सवडे

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील दत्त नगर भागातील रोहित्र गेल्या पंधर दिवसांपासून जळाल्याने अर्ध्य गाव अंधारात असल्याने टेंभुर्णी येथील विज वितरण कंपणीच्या गलथान कारभाराला ग्रामस्थ जाम वैतागले असून नागरीकांमध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जाफराबाद तालुक्यात टेंभुर्णी हे सर्वात मोठे लोकसंख्या असलेले गाव असुन आज घडीला या गावची लोकसंख्या जवळपास वीस हजारावर आहे. या गावाची मोठी बाजारपेठ असल्याने या गावाचा तालुक्यातील सर्वच गावाशी संपर्क असतो. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीचे सुध्दा निवडणूक दरम्यान जास्त लक्ष असते. आजरोजी पंधरा दिवसापासून रोहीञ जळालेले आहे. परंतु याकडे विजवतरण चे दुर्लक्ष आहे

वीज नसल्याने गावातील सर्व व्यवहार बंद झाले आहे. एक तर कोरोना व्हायरस या महामारीने सर्व व्यवहार ठप्प असतांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दुसर्‍यावर अवलंबून न राहता स्वता : आत्मनिर्भर बना असा देश वासीयांना संदेश देत असतांना  विज वितरण कंपणीचे अधीकारी याला ग्रामीण भागात हरताळ फासतांना दिसत आहे.

गावातील रोहित्र तात्काळ दुरूस्ती करावी नसता गावातील सर्व ग्रामस्थ विजवितरण कंपणीच्या कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरू करु असा इशाराच टेंभुर्णी येथील रवींद्र उखर्डे यांच्यासह ( तालुका अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जाफराबाद तथा ग्रामपंचायत सदस्य टेंभुर्णी) बाबुभाई पठाण, मुबारक पठाण, सांडू उखर्डे, शंकर उखर्डे, महादू उखर्डे, मंजीराम उखर्डे ,अहेलुबा उखर्डे ,हशम पाहुना  हरीभाऊ उखर्डे ,सुरेश उखर्डे,  नारायण उखर्डे  , गणेश उखर्डे अनिल उखर्डे, अशोक उखर्डे कुंडलिक डोमाळे, राकेश मुगुटराव गणेश तांबेकर ,वैजनाथ वरकटे,यांनी दिला आहे.

ऑइल नसल्याने अडचण- विजवतरण

याबाबत टेंभुर्णी येथील विज वितरण कंपणीचे इंजीनियर अनिल डुकरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की रोहित्र दुरुस्ती साठी लागणारे आॅईल कंपणीकडे उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे अणेक गावातील रोहित्र दुरुस्ती अभावी पडून आहे ऑइल उपलब्ध झाल्यास त्वरित वीजपुरवठा सुरळीत केला जाईल याबाबत वरिष्ठांशी चर्चा चालू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक