जालना जिल्हा

अँड. ब्रम्हानंद चव्हाण यांनी घेतली पानशेंद्रा हात्याकांडाताली पिडीतांची भेट

जालना/तुकाराम राठोड दि ८

जालना तालुक्यातील पानशेंद्रा गावातील बोरूडे कुटुंबावर गावातील गांगुडानी केलेल्या निर्घृण हल्ल्यात प्रदिप गौतम बोरूडे व राहुल बोरूडे या सख्या भांवाचा खुन झाला असुन त्यांच्या भाऊ रामेश्वर बोरूडे व घरातील महिला गंभीर जखमी असुन रविवारी रोजी बोरूडे कुटुंबाची जिल्हा रुग्णालयात जाऊन रिपब्लिकन पार्टी आँफ ईंडिया आठवले गटाचे मराठावाडा अध्यक्ष अँड ब्रम्हानंद चव्हाण यांनी भेट घेऊन या घटनेचा तिव्र शब्दात निषेध नोंदवला

घडलेल्या घटना संदर्भात चर्चा करण्यासाठी सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यक्रते यांच्या सोबत जालना येथील शासकीय विश्रांम ग्रहावर बैठक घेतली,सदर प्रकार पोळ्याच्या दिवशी झालेल्या किरकोळ कारणावरून पन मनात ठासुन भरलेला जातीय वर्चस्वादातुन झाल्याचे अत्याचारग्रस्त बोरूडे कुटुंबीयांनी माहिती दिली, बोरूडे कुटुंबांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष ठाम पणे ऊभे असुन या गावगुंडाना कठोर शिक्षा व्होवी म्हणून हे प्रकरण जलद गती न्यालयात चालविण्यात यावे, घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेल्या बोरूडे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात यावे ,कुटुंबाला शासनामार्फत मदत करून पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे मराठावाडा अध्यक्ष अँड ब्रम्हानंद चव्हाण यांनी केले आहे, या प्रसंगी त्यांच्या समवेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पप्पू कागदे,जिल्हा अध्यक्ष गणेश रत्नपारखे, विजय खरात, सुधाकर रत्नपारखे, एन, डी, गायकवाड, सतिष वाव्हळे, महेंद्र रत्नपारखे, बबन रत्नपारखे, सिध्दार्थ चव्हाण, अनिल खिलारे, ,उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक