Breaking News
जालना जिल्हा

जालना पोलीस मुख्यालयात सहायक फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

न्यूज जालना ब्युरो दि ८ जालना जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले फौजदार यांनी स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊ च्या दरम्यान जालना पोलीस मुख्यालयच्या शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे घडली आहे . जालना पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड हे सकाळी 8.45 वा. दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. त्यादरम्यान, शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यातच ते गतप्राण झाल्याचे समजते. घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशमुख, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत. याबाबत अद्याप आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहचली असून पुढील तपास पोलीस करत असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक