Breaking News
घनसावंगी तालुका

दहा दिवसांत ६४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले घनसावंगी तालुक्यातील एक गाव.!

धर्मराज आंधळे/पिपरखेड बु दि ८
घनसांवगी तालुक्यातील पिपंरखेड बु येथे काेराेणाचा रुग्णांत वाढ होताना दिसत असून ह्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ग्रामपंचायत ने दहा दिवसाचा लॉक डाऊनही जाहीर केला आहे .
मागील दहा दिवसांत गावात एकूण ६४ रुग्ण पिंपरखेड बु मध्ये आढळून आले आहे तर यातील तीन जणांना डीचार्ज सुद्धा देण्यात आलेला आहे . तालुक्यात कमी वेळेत सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णसंख्या असलेले गाव पिंपरखेड बु असल्याची माहिती समोर येत आहे.

दि ७ सप्टेंबर वार सोमवारी परत पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे यामध्ये ३ महिला व २ पुरुष असा एकूण पाच जनाचा समावेश आहे. पिपंरखेड गावाची काेराेणा पॉझिटिव्हची संख्या ६४ वर पाेहचली आहे

3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक