Breaking News
अंबड तालुका

..त्या वेब सिरीजचे प्रक्षेपण थांबवुन कारवाई करण्याची अंबडमध्ये मागणी

अंबड/अनिल भालेकर दि ८

बालाजी टेलिफिल्म ची निर्माती दिग्दर्शक एकता कपूरच्या घाणेरडे वेब सीरिजमध्ये (वर्जिन भास्कर. सिजन 2) ही वेब सिरीज फक्त प्रौढांसाठी आहे.या सिरीजमध्ये घाणेरडे गैरप्रकार चालणाऱ्या होस्टेलचे नाव “अहिल्याबाई लेडीज होस्टेल” असे दाखवण्यात आले आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या देशातील नीतिमान राज्यकर्त्यांच्या यादीत सर्वोच्च स्थानावर असून त्यांना तत्त्वज्ञ महाराणी म्हणून ओळखले जाते असे असूनही एकता कपूर यांनी आपण निर्माण केलेल्या सीरिजमध्ये अहिल्यादेवी चे नाव कुटील उद्देशाने वापरून त्याचा व समस्त देशवासीयांचा अपमान केला आहे.

यामुळे धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून धनगर समाजात एकता कपूर विरुद्ध रोष आहे. त्यामुळे एकता कपूर विरुद्ध महापुरुषाचा अवमान, समाजात रोष निर्माण करणे,शांतता बिघडवणे या गुन्हे अंतर्गत योग्य त्या भारतीय दंड विधानाच्या कलमाद्वारे गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करून या वेब सिरीज चे प्रक्षेपण थांबविण्यात यावे. अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर सौ.विजयमाला भालेकर, भागचंद खरात, सुनील दिवटे, संदीप खरात, गणेश जाधव, ज्ञानेश्वर दिवटे, रामनाथ मंडलिक आदी समाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक