Breaking News
अंबड तालुका

सरकारने खाजगी कोचिंग क्लासेस संचालक व शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवावे

जामखेड/विशाल भोजने दि ८

जगात सर्वत्र कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावाने अनेक उद्योग कोलमडून गेले आहे मागील एक महिन्यात सर्व उद्योग सुरू झाले आहे परंतु शिक्षण व्यवस्थेत समांतर व्यवस्था निर्माण करणार्‍या खाजगी कोचिंग क्लासेस मात्र आजुन सुरू करण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही.. अशा परिस्थितीत खाजगी कोचिंग क्लासेस संचालक, शिक्षक व इतर कर्मचारी भयंकर आर्थिक विवंचनेत सापडले आहेत

या संकटाच्या वेळी कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा पांडुरंग मांडकीकर यांनी महाराष्ट्रातील सर्व कोचिंग क्लासेस संचालकांना संघटित करून शासन दरबारी कोचिंग क्लासेस संचालकांच्या समस्या प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांना कोचिंग क्लासेसच्या मागण्या संदर्भात राज्याध्यक्ष प्रा.पांडुरंग मांडकीकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनही दिले आहे

१४ अॉगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर राज्याध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर,राज्य उपाध्यक्ष प्रा. पंढरीनाथ वाघ, राज्य सरचिटणीस प्रा. ज्ञानेश्वर ढाकणे, राज्य कोषाध्यक्ष प्रा. अप्पासाहेब म्हस्के पाटील यांनी भरपावसात केलेले ऐतिहासिक अमरण उपोषण सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केले.उपोषणाची दखल घेऊन कोचिंग क्लासेस सुरू करण्याचे सरकारचे संकेत दिले परंतु अद्याप कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा कोचिंग क्लासेस सुरू करण्यासाठी नियम व अटी घालुन दिल्या नाहीत मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, लोकप्रतिनिधी मंत्री, खासदार, आमदार यांना कोचिंग क्लासेस संचालक व शिक्षक यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवेदन दिले जात आहे. जर सरकारने तातडीने प्रश्न सोडविला नाही तर येणार्‍या १० सप्टेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर कोचिंग क्लासेस असोसिएशन राज्याध्यक्ष प्रा.पांडुरंग मांडकीकर यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण व वेळ प्रसंगी जेलभरो आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक