घनसावंगी तालुका

शिवनगाव बंधारा पुलाला भगदाड : शिवनगाव रस्ता तात्काळ करण्याची मागणी

घनसावंगी प्रतिनीधी/नितिन तौर शिवनगाव बंधारा रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ दुरुस्त करुन शिवनगाव,भादली रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याची मागणी होत आहे. घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव बंधार्याच्या पुलावरुन जड वाहतुकीमुळे पडलेल्या खड्यात पाणी पाणी साचून भगदाड पडत आहेत तर यामुळे रस्त्याच्या कामात वापरलेला खडी,वाळू व सिमेंट निघुन गेला असुन लोखंड दिसून येत आहे या पुलावरील खंड्याची दुरुस्ती तात्काळ दुरुस्ती न केल्यास मोठ मोठे भगदाड पडून पुल धोकायदायक बनू शकतो तसेच शिवनगाव,भादली रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करावा अशी मागणी शिवनगाव सह परिसरातुन होत आहे. शिवनगाव ते कुंभार पिंपळगाव रस्ता होणार? घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील शिवनगाव,भादली,नाथनगर रस्त्याची पार वाट लागली असुन रस्त्याने जाताना नागरिकांना पावलो पावली लोकप्रतिनिधीची आठवण होत असुन याच रस्त्याने जाताना खराब रस्त्यामुळे शिवनगाव येथिल दोन महिलांची रस्त्यावरच प्रसूती झाली होती मात्र दगडाच काळीज असणारे लोकप्रतिनिधि गेल्या 22 वर्षापासून विकासाच्या गप्पा मारतात हा विकास नेमक्या आहे तरी कुठला असा सवाल नागरिकांतुन विचारला जात आहे तर शिवनगाव रस्ता नेमका कधी होणार आणि दरवेळी निवडणुकी दरम्यान दिलेले आश्वासन पाळणार का?….की लोकवर्गनीतुन रस्ता करावा लागणार असा सवाल नागरिकातून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक