Breaking News
जालना तालुका

हस्ते पिंपळगाव कपाशीवरील रोग नियंञण व खत व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

बबनराव वाघ,उपसंपादक

कृष्णा नानवटे/हस्ते पिंपळगाव : दि.8 मंगळवार रोजी हस्ते पिपळगाव येथे B.C.I.उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्प अंतर्गत शेतकरी वर्गाला कपाशी पिकावरील रोग ओळखुण त्याचे निवारण कसे करावे यासंदर्भात माहिती देण्यात आली.
या मध्ये कपाशीवरील रोग नियंत्रण खत व्यवस्थापन या बाबत माहिती देण्यात आली. मराठवाड्यातील शेतकरी कपाशीचे पिक जास्त प्रमाणात घेत असतो. यावर्षी सुध्दा कपाशीची लागवड जास्तच आहे.परंतु यावर्षी सतत सुरू असलेल्या पावसामुळे बरीच कपाशीचे नुकसान झाले तर काही कपाशीत रोगांचे प्रमाण वाढल्याचे दिसुन येत आहे. याअनुषंगाने हा मार्गदर्शन सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
या वेळी, गावातील नागरिक उपस्थित होते.या मध्ये BCI चे जालना प्रोजेक्ट मॅनेजर सचिन गायकवाड व PU मॅनेजर सुजित जोगस व क्षेत्रिय सहायक संतोष अहिरे यांनी पीक पाहणी व मार्गदर्शन केले.
या वेळी गावातील प्रतिष्ठित माणिक नांनवटे,लक्ष्मन नांनवटे,भरत उरधुखे, राजू कावळे,नारायण मगर,संतोष मगर,सुखदेव मगर,संतोष किंगरे,गजानन मगर आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक