घनसावंगी तालुका

श्रीपत धामणगाव येथे तीन दिवसांनपासून उपोषण वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

श्रीपत धामणगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे उपोषण

संभाजी कांबळे/ अजय गाढे दि ९

घनसावंगी तालुक्यातील श्रीपत धामणगाव येथिल गाव अंतर्गत विकास कामावर दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करुन विकास कामे तत्काळ करण्यात यावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी कडून दि.7 पासून आमरण उपोषण करण्यात येत आहे


याविषयी अधिक माहिती अशी की मौजे श्रीपत धामणगाव येथिल गाव अंतर्गत सिमेंट रस्ते,गावचा रिंग रोड,दलीत् वस्ती सुधार योजना,स्वछता,पाणीपुरवठा योजना,रोजगार् हमी योजना गावात व दलित वस्तीस एक स्मशान भूमि सेड,ड्रनेज लाईन,भूमिगत गटार योजना,गावात दिवा बत्ती योजना, हगंदारी निर्मूलन,अशा अनेक मागण्यांचे निवेदने ग्रामपंचायत पंचायत समिती,तहसीलदार,उप मुख्य कार्यकारी अधिकारी,तसेच जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा निवेदन देऊनही अद्याप याकडे दुर्लक्ष्य करण्यात येत आहे,

तसेच गावातील अंगणवाडी इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे याकडे प्रशासन दुर्लक्ष्य करत आहे.पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आसताना त्यानी कोणतीही चौकशी केलेली नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे .यामुळे वंचित बहुजन आघाडी तर्फे उपोषण करन्यात येत आहे यात राहूल वाहुळे व विजयानंद शेळके तसेच ग्रामस्थ यानी दि.7रोजी आमरण उपोषणाच्या इशारा देण्यात आला होता त्याअनुषंगाने संविधानीक मार्गचा अवलंब करत कर्तव्यात बेजबाबदार आधिकारी व कर्मचारी निलंबनच्या मागणीचे निवेदन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिले होते यावेळी मिलींद वाहुळे,गौतम वाहुळे,गुलाब वाहुळे,विध्यसागर वाहुळे,भीमराव वाघमारे,लक्ष्मण अन्कुशे,बाबूरावअन्कुशे,किरण वाहुळे,रघुनाथ वाहुळे,प्रकाश पट्टेकर,कल्याण रंधवे,सुरेश मुंढे,रविंद्र मुंढे,गणेश शिंदे,अनिल येले,सुनिल येले, बाळासाहेब शिंदे,बाबासाहेब वाहुळे, व इतर ग्रामस्थांनी विकासकामांसाठी मागणी करत तक्रारी तसेच निवेदनाद्वारे या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली होती मागण्या पूर्ण होत नसल्याने उपोषण करण्यात येत आहे तीन दिवसांनपासून होत असलेल्या उपोषण कर्त्यांची प्रकृती खाल्यावल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक