भोकरदन तालुका

जिल्हाध्यक्ष नितीन काळे तर तालुकाध्यक्ष हनुमंत ठोंबरे


राजूर प्रतिनिधी दत्ता डवले दि ९
श्रीक्षेत्र राजूर येथून जवळच असलेल्या पळसखेडा ठोंबरी येथील युवा कार्यकर्ते नितीन रामदास काळे यांची जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्यच्या जालना जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भोकरदन तालुकाध्यक्ष पदी हनुमंत ठोंबरे यांची करण्यात आली आहे.


नितीन काळे हे गेल्या अनेक वर्षापासून राजूर सह परिसरात सामाजिक उपक्रम राबवतात तसेच कायम जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व म्हणून ओळख निर्माण कलेली आहे.सतत शेतकऱ्यांच्या समस्या, सर्वसामान्य लोकांच्या समस्या मांडून त्यासाठी सामाजिक जाणीवेतून काम केलेले आहे.त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. हि निवड जनशक्ती युवा संघटनेचे प्रमुख हरीष शिवनेचारी यांनी एका नियुक्त्पत्राद्वारे केली असून. येणाऱ्या काळात संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिक , कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न व आडी अडचणी लक्ष्यात घेऊन त्या शासन दरबारी मांडून आवाज उठवावा तसेच सामाजिक भावनेतून संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे .
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे राजू काळे,रामेश्वर काळे, भीमाशंकर दारुवाले,सुधाकर काळे,भगवान ठोंबरे,अंकुश काळे, डॉ.निलेश काबरा,भगवान पुंगळे,चेतन अग्रवाल ,कैलास हिरगुडे,अशोक काळे ,उद्धव ठोंबरे,विजय ठोंबरे,विलास ठोंबरे,संतोष काळे,मधुकर काळे,कृष्णा काळे,दत्ता इंगळे,संदीप काळे,काकासाहेब काळे,श्रीमंता काळे, मंगेश काळे यांच्यासह मित्र परिवाराच्या वतीने स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक