Breaking News
घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाने उसाचे पीकाचे अतोनात नुकसान

जांबसमर्थ / कुलदीप पवार दि ९

जांबसमर्थ परीसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे आतोनात नुकसान नुकसान झाले असून यात उसाचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून होत आहे

घनसावंगी तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने ऊस,कापुस सोयाबीन सह इतर पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे.सुरूवातीला दमदार पाऊस कधी येईल, या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांचा नजरा होत्या मात्र सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.

यातच शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात मेहनत करून पिकांना कसेबसे जीवदान दिले होते.परंतू अचानक झालेल्या वादळी पावसाने पिकांचे प्रचंड प्रमाणात केले आहे.परीसरात भेंडाळा,जांबसमर्थ,विरेगाव,मूर्ती,कोठाळा घाणेगाव या ठिकाणी ही प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून,या नुकसानीची पालकमंत्री यांनी तात्काळ येथील महसूल प्रशासनाला आदेश देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक