Breaking News
देशविदेश

आताची मोठी बातमी : मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग

मुंबई – सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे . मराठा आरक्षण प्रकरण आता घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे .

आता पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले घटनापीठ मराठा आरक्षणावर सुनावणी करणार आहे . त्यामुळे आता मराठा आरक्षणाचे भवितव्य आता घटनापीठाच्या निर्णयावरून ठरणार आहे .

महाराष्ट्रात बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे , अशी मागणी दीर्घकाळापासून करण्यात येत होती . त्यानंतर मराठा समाजाने काढलेले मुक मोर्चे आणि नंतर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर तत्कालीन सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता . त्यानंतर या विषयावरून पुन्हा न्यायालयीन लढाई सुरू झाली होती . उच्च न्यायालयातील सुनावणीत मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली होती . तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी सुरू आहे . दरम्यान , सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने त्याचा मराठा समाजातील उमेदवारांना नोकरी आणि शिक्षणातील प्रवेशांमध्ये आता आरक्षण मिळणार नाही .तर

महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्य याचिका असल्याने राज्याला अगोदर युक्तिवाद करू द्यावा , अशी विनंती राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी केली होती . मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होता . केंद्र सरकारने दिलेल्या आर्थिक आरक्षणाचे प्रकरण घटनात्मक खंडपीठाकडे गेले आहे . त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातले प्रश्न चर्चा करण्यासाठी त्यापेक्षा मोठे खंडपीठ हवे , अशी बाजू रोहतगींनी मांडली . मराठा आरक्षणाचा निर्णय निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अहवालाआधारे घेण्यात आला . मराठा आरक्षण आणि आर्थिक आरक्षणाचे प्रकरण एकमेकात गुंतलेले आहे . त्यामुळे हे प्रकरण विस्तारीत खंडपीठाकडे जाण्याची गरज आहे , असा युक्तिवाद रोहतगी यांनी केला . तर सिब्बल म्हणाले , इंद्रा साहनी प्रकरणात १ ९ ३१ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला होता . महाराष्ट्रातील ८५ टक्के लोकसंख्या मागास प्रवर्गातील आहे . त्यामुळे इंद्रा साहनी प्रकरणाचा अडथळा अधिक आरक्षण देण्यासाठी येत नाही .

शोर्स -लोकमत ऑनलाइन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक