Breaking News
जालना जिल्हा

अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती; जावक अटीमुळे पालकांची दमछाक.!

सादिक शेख/आन्वा प्रतिनिधी : संपूर्ण देशात मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, सिख, पार्सी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील पहिली ते दहावीतील शिक्षण घेणाऱ्यां विद्यार्थ्यांना केंद्र सरकार तर्फे प्रतिवर्ष एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते, त्यासाठी फार्म भरण्याकरीता पालकांना अनेक अडचनींना सामोरे जावा लागत आहेत. इतके करुनही अनेक विद्यार्थी यापासुन वंचीत राहत असल्याने पालकांनी सदर योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.


या वर्षापासुन विद्यार्थ्यांच्या बोनाफाईड अपलोड करणे बंधनकारक केले असून सदर अट पूर्ण करण्याकरिता पहिले फार्म भरतांना बोनाफाईड डाऊनलोड करुन त्याची प्रिंटवर विद्यार्थ्यांचे फोटो लाऊन शाळेच्या मुख्याध्यापकाची सही शिक्का घेऊन तो अपलोड करावा लागत असल्यामुळे पालकाची दमछाक होतांना दिसत असल्याने अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ची गत “चार आण्याची कोंबडी – बारा आण्याच्या मसाला” अशी झाल्याचे दिसते, संपूर्ण प्रक्रियेत पालकांचे मोठा वेळ जात आहेत. त्यामुळे पालक पुरते वैतागल्याचे पहायला मिळत आहेत.
सद्या देशात कोवीड आजाराने थैमान घातले असून यात फार्म भरण्याकरीता लागणारे कागदपत्रांची पूर्ताता करण्याकरिता विद्यार्थी व पालकांना आपले जीव धोक्यात घालत असल्याने या जाचक अटी व शर्ती वगळण्यात यावी अशी पालकांत मागणी होत आहेत.

बोनाफाईड अपलोड करण्याची अट रद्द करण्यात यावी तसेच पालकांचे स्वंमघोषीत किंवा ग्राम प्रधान, सरपंच यांचे उत्पन्न ग्राह्य धरण्यात यावे, विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने लहान शाळकरी मुलांचे खाते शाळेच्या बोनाफाईडवर उघडण्यात यावे जेणेकरुण योजणेच्या लाभ सर्वांना मिळण्यास मदत होईल योजनेच्या उद्दीष्ठ 100 टक्के पूर्ण होईल,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक