Breaking News
जालना जिल्हाभोकरदन तालुका

आन्वा प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविना,ग्रामस्थांतुन संताप

आन्वा ता भोकरदन दि ९ : ग्रामीण भागातील नागरिकांना तत्काळ आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मात्र आन्वा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याला अपवाद ठरत असल्याचे दिसून येत आहे.


वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय या केंद्राचा कारभार सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना अनेकदा उपचाराशिवाय परत जावे लागत असून या केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्राची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


सध्या पावसामुळे जलजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी लोकांना गावात असलेल्या आरोग्य केंद्राचाच आधार असतो. परंतु या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आन्वा येथे असलेल्या आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन पदे मंजूर असून प्रत्यक्षात एकाही वैद्यकीय अधिकारी दिसत नाही. मागील एका वर्षांपासून कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी प्रविण दांडेगावकर, ज्ञानेश्वर वाघमोडे यांनी नुकतेच पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय काम सुरू आहे.
या आरोग्य केंद्रांतर्गत आन्वा, आन्वा पाडा, कोदा, धोंडखेडा, करलावाडी, जानेफळ गायकवाड, वाकडी, कुकडी, कठोरा बाजार, वाडी बुद्रुक, वाडी खुर्द, मलकापूर, मनापूर, आलापूर, गोकुळ, भिवपूर, आव्हाणा, मालखेडा, ठालेवाडी, सुभानपूर, पेरजापूर, इब्राहिमपूर आदी गावात पावसाळी वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, ताप व अतिसाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. तसेच ग्रामीण भागात जलजन्य आजाराने तोंड वर काढले असून दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक