कोरोना पॉझिटिव्ह बातमीघनसावंगी तालुकाजालना जिल्हा

कुंभार पिंपळगावसह बाजूच्या गावात ६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनिधी / दि ९
घनसावंगी तालुक्यातील अरगडे गव्हाण येथे २ जण ,पिंपरखेड येथें २ जण पांगारा येथे १ जण तर अँटीजन चाचणीत कुंभार पिंपळगाव येथे १ असे सहा जणांचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे

अरगडे गव्हाण येथील ४० वर्षीय पुरुष व ३७ वर्षीय महिलेचा समावेश आहे तर पिंपरखेड येथील ३४ आणि २६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर कुंभार पिंपळगाव येथे केलेल्या अटीजन चाचणीत ५० वर्षीय पुरुषचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ दीपाली चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान जालना प्रयोगशाळाकडून दुपारी प्राप्त पॉझिटिव्ह अहवालात जिल्ह्यातील एकूण २६ जण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे त्यात घनसावंगी तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे. तर एक अटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक