Breaking News
परतूर तालुका

परतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हजारो एकरातील तोडणीस आलेले ऊस पिक भुईसपाट ; बळीराजा परत सापडला आर्थिक संकटात

आष्टी(प्रतिनिधी दि ९) आष्टीसह परिसरात वादळी वाऱ्या सह झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला ऊस वाया गेला असून शेतकऱ्यांचे पिक पूर्णपणे भुईसपाट झाल्याने नुकसान मोठे नुकसान झाले असून झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत तात्काळ मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे

तालुक्यातील आष्टी,काऱ्हाळा,लिंगसा,अकोली, गोळेगाव,लोणी,सावंगी,चांगतपुरी,संकनपुरी, लांडकदरा,आनंदगाव,सावरगाव, धामणगाव, पळशी,फुलवाडी,व इतर काही गावांत दि.०७ रोजीच्या मध्यरात्री झालेल्या जोरदार वारे व पावसाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो एकरातील ऊस पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत, वाऱ्याचा व पावसाचा जोर इतका भयंकर होता की त्यामुळे पिकांची सर्वत्र नासधूस झाली आहे,हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने शेकडो शेतकऱ्यांना या वादळी वाऱ्याचा फार मोठा आर्थिक फटका बसल्याने शासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.गोदावरी नदीच्या पात्रात व जायकवाडीच्या डाव्या कालव्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड करण्यात आली होती.जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्यांकडे ऊस लागवड करण्यात आली होती त्यातच यावर्षी निसर्गाने व्यवस्थित पणे साथ दिल्याने सर्वच पिके जोमात आली होती मात्र आस्मानी संकटाचा पुन्हा एकदा प्रकोप झाला. त्यात हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, शासनाकडून नुकसान पिकांचे पंचनामे करावे अशी मागणी ऊस बाधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक