Breaking News
परतूर तालुका

बांधकाम कामगारांना काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत मधून देण्याची मागणी


आष्टी ता परतूर दि ९:- गावपातळीवर काम करणारे बांधकाम मजूर ,रोजगार हमी,शेतमजूर कामगार,ऊसतोड कामगार हे अधिकृत कामगार म्हणून शासनाने जाहीर केले आहेत त्या विषयी चे प्रमाणपत्र गावपातळीवर गावातील ग्रामपंचायत कार्यालया मधून या कामगारांना 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक देत नाही त्या मुळे या कामगारांना जीवन विमा ,वैद्यकीय सुविधा,त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी सवलत इत्यादी योजनेचा कुठलाच लाभ मिळत नाही

त्या मुळे गावपातळीवर ग्रामसेवकांनी 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्या बाबत आदेशीत करण्यात यावे अशी मागणी बाबतचे निवेदन गटविकास अधिकारी परतूर यांना देण्यात आले असून या वर गणेश वाहुळे, हरिभाऊ रोहिमल, संतोष धुमाळ, प्रल्हाद वाहुळे, रघुनाथ टेकाळे, पंचशील टेकाळे, शेषराव प्रधान,गणेश राठोड, पांडुरंग पोपळघट,मच्छिंद्र पवार, पप्पु वाहुळे,आदींचे नावे व स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक