Breaking News
भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यात एका पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन गावात हैदोस ,एकाच दिवशी तेरा जणांसह अनेकांना चावा

जळगाव सपकाळ( ता भोकरदन ):- भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ व दहिगांव या दोन गावामध्ये एकाच पिसाळलेल्या कुञ्याने अकरा जणांना चावा घेतल्याने त्याना पुढील उपचारासाठी अारोग्य केंद्रात दाखल केले असता तेथे लस उपलब्ध नसल्याने औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल व्हावे लागले आहे बुधवारी भल्या पहाटे जळगाव सपकाळ येथील अनेक स्त्री-पुरुष मॉर्निंग वॉकसाठी जातात तसेच शेतकरी वर्ग गाई-म्हशींचे दूध काढण्यासाठी आपल्या शेताकडे जात असतात त्याच वेळी सकाळी पाच वाजता अचानक एक कुत्रा गावात शिरला त्याने सर्वप्रथम येथील अशोक गाडेकर हे मॉर्निंग वाकला जात असताना त्यांच्या हाताला चावा घेतला त्यानंतर कुत्रा गाव भर पळत असताना रस्त्यात जे भेटेल त्यांना चावत गेला दोन महिला घरासमोर अंगण झाडत असताना त्यांनाही हा कुत्रा चावला त्यात त्या महिला जखमी झाल्या . एका महिलेच्या चेहऱ्यावर त्याने झडप घालून डोळ्यास दुखापत केली अशोक गाडेकर, संदीप सपकाळ, रमेश सपकाळ ,आदिनाथ सपकाळ, मंगलाबाई सपकाळ, छाया सपकाळ ,अर्चना सोनवणे, तृप्ती नेमाने, तसेच पंजाब सपकाळ यांची म्हैस सुरेश शेळके यांची वासरी रमेश राऊत यांचे दौन बैल अशा सात जनावरांना या कुत्र्याने चावा घेतला. तर दहिगांव येथील सचिन सोनवणे,रोहित कानडजे,पुनम गावंडे,शिवानी राऊत,शिवाजी गांवडे या पाच जणांना दुपारी चावा घेतला त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर तातपुरते उपचार करुन गुरुवारी जालना जाण्याचा सल्ला देण्यात अाला अाहे. चावा घेतलेल्या दोन गावातील सहा महिला आणि सात पुरुष यापैकी जळगाव सपकाळ येथील अाठ जणांना यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.सकाळी सकाळी या कुत्र्याने गावात धुमाकूळ घातल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामपंचायत कर्मचारी कुत्र्याच्या मागावर असून कुत्रा पकडण्याची शर्थीने प्रयत्न करत आहेत पण कपाशी मक्का पिकामध्ये कुत्रा घुसल्याने त्याला पकडण्यात अडचण येत आहे .
चावा घेतलेल्या रुग्णावर आपण प्राथमिक उपचार केले आहे व पुढील उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे आपल्या येथे कुत्र्याचे इंजेक्शन संपलेले आहे आणि आपण दोन दिवसापूर्वीच त्याच्या इंजेक्शनची मागणी सुद्धा केलेली आहे. वैद्यकीय अधिकारी श्रीमती आर के नागरे प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव सपकाळ.
वैद्यकीय अधिकारी वसीम पठाण प्राथमिक आरोग्य केंद्र जळगाव सपकाळ. आपल्या केंद्रावर हे इंजेक्शन उपलब्ध असते तरीही रुग्णांना औरंगाबाद येथेच रेफर करावे लागले असते कारण एका व्यक्तीस कुत्रा चावला याची ट्रीटमेंट वेगळी असते आणि तोच कुत्रा जर अनेकाना चावला तर त्याची ट्रीटमेंट ही वेगळी असते आणि अशी ट्रीटमेंट औरंगाबाद येथे होते त्यामुळे आम्ही सर्व रुग्ण औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात रेफर केले आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील तरूण कुत्र्याचा शोध घेत आहे पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरच करण्यात येईल. शामकांत सपकाळ-सरपंच जळगाव सपकाळ
मी व माझे सहकारी सकाळी फिरण्यास चाललो होतो. अचानक पाठीमागून येऊन कुत्र्याने माझ्या हाताला चावा घेतला. काही कळायच्या आतच तो कुत्रा समोर जाऊन परत एका महिलेला चावला. संदीप सपकाळ ग्रामस्थ जळगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक