अंबड तालुका

अंबडमध्ये मास्क सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांकडुन २८ हजाराचा दंड वसूल

अंबड / प्रतिनिधी दि ९

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंबड शहरातील वाढती गर्दी व सर्रास होणारी नियमांची पायमल्ली याबाबत तीन वेगवेगळ्या पथकांनी बुधवारी कारवाई केली. मास्क न वापरणे व सोशल डिस्टंसिंग न ठेवल्याण्बाबत २८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लॉक-डाउनचे जवळ जवळ सर्व निर्बंध उठविल्यानंतर रुग्णांची वाढती संख्या पाहता अंबड शहरातील नियमबाह्य गर्दीला आळा घालण्यासाठी मास्क व सोशल डिस्टन्सिंग बाबत कारवाई करण्यात येत आहे.

महसूल, नगर परिषद, पंचायत समिती व पोलीस विभाग यांच्या तीन संयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली. महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली इतर तिन्ही विभागाचे प्रत्येकी तीन कर्मचारी, अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे. दहा सदस्यांचे हे पथक शहरातील विविध भागात कारवाई करत आहे.

उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार विद्याचरन कडवकर व पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आज बुधवारी दिवसभरात तिन्ही पथकांनी मिळून तब्बल ७२ जणांविरुद्ध मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंग न ठेवणे याबाबत २८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक