जालना जिल्हा

जालन्यात अभ्यास पुस्तिकेचे जिल्हा परिषदचे सीईओ यांच्या हस्ते विमोचन

न्यूज जालना ब्युरो दि ९

जि.प.प्रा.शाळा गुंडेवाडी , केंद्र जामवाडी , कोवीड – १९ च्या साथ रोग संसर्गाच्या संकट काळामध्ये ऑनलाईन शिक्षणा बरोबरच ज्या विद्यार्थ्याला ऑनलाईल अभ्यासाची सोय उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी व मुलांचे शिक्षण हे अखंड चालू राहावे या साठी जि.प.प्रा.शाळा गुंडेवाडी , केंद्र जामवाडी , ता.जि.जालना या शाळेतील शिक्षक श्री.सुनिल नारायण साबळे यांनी इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संपुर्ण विषयाच्या अभ्यासावर आधारीत ” माझे शिक्षण अखंड शिक्षण ” कार्य पुस्तिका तयार करुन या पुस्तिकेचे विमोचन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांच्या हस्ते मंगळवार (दि- ०८) रोजी करण्यात आले.

ही पुस्तिका विद्यार्थ्यांना मोफत वाटप केली . या पुस्तिकेत सर्व विषयातील सर्व पाठांवर आधारीत स्वाध्याय , प्रश्न व ६५ संमिश्र बहु पर्यायी प्रश्न दिले आहे . शिवाय विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी पुरेशी जागा सुध्दा या पुस्तिकेत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . या पुस्तिकेसाठी प्रेरणास्थान मा . मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा मॅडम , शिक्षणाधिकारी श्री.कैलास दातखिळ साहेब , उपशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब खरात साहेब , तर या पुस्तिकेसाठी गट शिक्षणाधिकारी श्रीमती गीता नाकाडे मॅडम , केंद्रप्रमुख श्री.बद्रीप्रसाद सोनवणे , मुख्याध्यापक श्री.रविंद्र कार्लेकर , श्री.मंगेश जेवाळ व विकास पोथरे यांनी मार्गदर्शन केले. या विमोचन प्रसंगी अरोरा मॅडम यांनी पुस्तिकेचे भरभरुन कौतुक केले .

प्रत्येकास पुस्तिका वाटप केल्या बदल समाधान व्यक्त केले व पुढे अशा म्हणाल्या की , अशा प्रकारच्या पुस्तिकेमुळे मुलांना 100% निश्चितच फायदा होईल व साथरोग संसर्गाच्या काळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासुन निश्चितच वंचित राहणार नाही . या प्रंसगी श्री.मंगेश जैवाळ ( चेअरमन ) , श्री.विकास पोथरे , सुनिल ढाकरगे , काशिनाथ आचलखांब व सुनिल साबळे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक