Breaking News
जालना जिल्हा

त्या फौजदार आत्महत्या प्रकरणात 15 जणांचे जबाब नोंदवले

न्यूज जालना ब्युरो दि १०

एएसआय सुभाष गायकवाड आत्महत्या प्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला असुन ते काम करीत असलेल्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकुण पंधरा जणांचे आतापर्यंत या प्रकरणी जबाब नोंदवण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.

सुभाष गायकवाड यांच्या कुटूंबीयांचे जबाब नोंदवणे अद्याप बाकी असून त्यांच्या कुटूंबीयांच्या जबाबानंतरच याबाबत ठोस निष्कर्ष मिळू शकतात अशी माहिती सुत्रांनी दिली.

जालना पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष गायकवाड हे मंगळवारी सकाळी 8.45 वा. दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. यावेळी, शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यातच ते गतप्राण झाले होते.

घटनास्थळाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. बुधवारी त्यांच्यावर जालना येथे अंतीम संस्कार करण्यात आले.

या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग केला आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख राजेंद्रसिंह गौर यांच्या पथकाने आतापर्यंत पंधरा जणांचे जबाब नोंदवले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक